जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कृषि मंत्री आणि राज्यमंत्र्यांवर महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळाने केली जादा गाड्यांची खैरात केली असल्याचे उघड झालंय. मंत्री महोदयांना त्यांच्या कामकाजाकरिता प्रत्येकी एक वाहन उपलब्ध करुन दिले जाते पण राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी अतिरिक्त 2 तर राज्यमंत्री सदा खोत यांनी अतिरिक्त 1 वाहन वापरत असून त्यांस ड्रायव्हरचीही सरकारी खर्चानं सोय केल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळ मर्यादित यांनी दिली आहे.
माजी कृषि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोबत मंत्र्यांचे खाजगी सचिव आणि कृषि खात्याचे प्रधान सचिव यांनीही वाहत्या गंगेत हात धुतले आहत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.