दूध दरात पुन्हा दोन रुपयांची कपात

दूध दरात पुन्हा दोन रुपयांची कपात

राज्यातील कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्य सरकारकडून टाळेबंदी देखील वाढवण्यात आली आहे. या टाळेबंदीमुळे दुधाची मागणी कमी होत असल्याचे कारण सांगत दूध संघाकडून दुधाच्या दरात सातत्याने कपात केली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून दुधाच्या दरात पुन्हा दोन रुपयांनी कपात करण्यात आली आहे.

वाहतुक, दलाली यासह २२ ते २३ रुपये दिले जात असल्याने शेतकऱ्यांच्या हातात आता प्रति लिटरला केवळ २१ रुपयेच पडणार आहेत. त्यामुळे दर दिवसाला बसणाऱ्या आर्थिक नुकसानात आता अडीच कोटी रुपयांनी भर पडली आहे. सध्या राज्यात दर दिवसाला तेरा कोटींपेक्षा दूध उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही कोरोनामुळे दूध व्यवसाय अडचणीत येत असल्याचं दिसून येत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version