राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. तसेच राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात शनिवार ६ हजार २६९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ७ हजार ३३२ जण कोरोनातून बरे झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण ६० लाख २९ हजार ८१७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ०.२ ने वाढले असून ९६.३५% इतके झाले आहे.
मुंबईत शनिवारी ४१३ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर ६११ जण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर हा ९७ टक्के इतका झाला असून मुंबईत सध्या ५ हजार ७९९ सक्रिय रुग्ण आहेत.
#CoronavirusUpdates
२४ जुलै, संध्या. ६:०० वाजता २४ तासात बाधित रुग्ण – ४१३ २४ तासात बरे झालेले रुग्ण – ६११
बरे झालेले एकूण रुग्ण – ७०९८०९
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७% एकूण सक्रिय रुग्ण- ५७९९ दुप्पटीचा दर- १२४१ दिवस
कोविड वाढीचा दर (१७ जुलै ते २३ जुलै)- ०.०५% #NaToCorona — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 24, 2021
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.