आमदारानंतर आता माजी खासदाराच्या खात्यात जमा झाली कर्जमाफीची रक्कम

आमदारानंतर आता माजी खासदाराच्या खात्यात जमा झाली कर्जमाफीची रक्कम

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

 

माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांनी कर्जमाफीचा कोणताही अर्ज भरला नसतांना त्यांना प्रोत्साहनपर 15 हजार 482 रुपयांची कर्जमाफी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खरे लाभार्थी वंचित आहेत व जे निकषात बसत नाही त्यांना कर्जमाफी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येतोय.

 

माजी खासदार अ‍ॅड.वसंतराव मोरे यांनी टेहू विविध कार्यकारी सोसायटीमधून कर्ज घेतले होते. पण शासनाने कर्जमाफीच्या आदेशात लोकप्रतिनिधींना या कर्जमाफीचा लाभ घेता येणार नाही असे नमूद केले होते. त्यातच माजी खासदार अ‍ॅड. वसंतराव मोरे हे पेन्शन घेतात म्हणून ते यासाठी पात्र ठरत नव्हते. त्यानुसार त्यांनी कर्जमाफीचा कोणताही अर्ज भरलेला नव्हता.

त्यानंतरही त्यांच्या खात्यात कर्जमाफीचा प्रोत्साहनपर 15 हजार 482 रुपयांची रक्कम जमा झाली आहे. अ‍ॅड.वसंतराव मोरे यांनी कर्जमाफीची जमा झालेली रक्कम परत करीत कर्जमाफीच्या सावळ्या गोंधळाबाबत माहिती दिली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version