दादा गटाच्या संभाव्य खातेवाटपाची यादी ‘जय महाराष्ट्र’च्या हाती

दादा गटाच्या संभाव्य खातेवाटपाची यादी ‘जय महाराष्ट्र’च्या हाती

मुंबई, ४ जुलै २०२३, प्रतिनिधी: सध्या राजकीय वर्तुळात अनेक चढउतार चालू आहेत. त्याच आता अजित पवारांची शपथविधी फारच रंगताना दिसत आहे. यातच आता शपथविधीनंतर खाते वाटपावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. अनेक महत्त्वाची खाती दादा गटाच्या वाट्याला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अर्थ, जलसंपदा, सामाजिक बांधकाम खातं राष्ट्रवादीला देऊ नका अशी आग्रहाची मागणी शिवसेनेच्या आमदारांची आहे. मात्र आता दादा गटाच्या संभाव्य खातेवाटपाची यादी ‘जय महाराष्ट्र’च्या हाती लागली आहे.

दादा गटाचे संभाव्य खातेवाटप

  • अजित पवार – महसूल मंत्री
  • छगन भुजबळ – ओबीसी कल्याण
  • दिलीप वळसे – पाटील – संसदीय कार्य, कृषी
  • हसन मुश्रीफ – औकाफ, कामगार कल्याण
  • आदिती तटकरे – महिला आणि बालविकास
  • धनंजय मुंडे – समाज कल्याण
  • संजय बनसोड – क्रीडा आणि युवक कल्याण
  • अनिल पाटील – अन्न आणि नागरी पुरवठा
  • धर्माराव आत्राम – आदिवासी विकास

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version