‘बॉम्बचा आवाजही येऊ द्यात, नुसता धूर नको’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

‘बॉम्बचा आवाजही येऊ द्यात, नुसता धूर नको’ – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बारामतीमध्ये इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेसुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

  इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटना वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. कुणीतरी दिवाळीनंतर बॉम्ब फोडण्याची भाषा करत आहे. त्यांनी बॉम्ब तर फोडावाच पण त्याचा आवाजही येऊ द्यात. नुसता धूर काढू नका, अशी अप्रत्यक्षरित्या टीका मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांवर केली आहे.

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, इन्क्युबेशन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पवार कुटुंबांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. तसचे ते म्हणाले, आम्हीदेखील २५ वर्षे हे सेंटर चालवले आहे. त्यात नको ती अंडी उबवली. त्याचे पुढे काय झाले ते तुम्ही पाहिलेत, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप पक्षासोबतच्या २५ वर्षांच्या युतीवर भाष्य केले. या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसेच अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते.

  राज्यात एकाचवेळी महाविकास आघाडीला दोन धक्के बसले आहेत. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. तर अजित पवारांच्या संबंधित मालमत्तेवर आयकर विभाग छापे टाकणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version