ओखी चक्रीवादळ अरबी समुद्रात धडकणार: मुंबईसह कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

ओखी चक्रीवादळ अरबी समुद्रात धडकणार: मुंबईसह कोकण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

कोकण किनारपट्टीजवळ असणा-या सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

भारतीय हवामान खात्याकडून मिळालेल्या सुचनेनुसार 3 ते 6 डिसेंबर या कालावधीत अरबी समुद्रात ओखी चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे.

याबाबत कोकण किनारपट्टीजवळील सर्व जिल्ह्यांना राज्य सरकारने सतर्कतेचा इशारा दिलाय.

विशेष क्षेत्रीय विभागाच्या हवामान खात्याच्या अहवालानुसार पुढील 48 तास ढगाळ वातावरणासह तुरळक पावसाची शक्यता राहणार आहे.

या कालावधीत सतर्कतेचा उपाय म्हणून लोकांनी वादळी वारे सुरु असताना घराबाहेर पडू नये. दूभती तसेच इतर जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत, मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये, तुटलेल्या विजेच्या तारांपासून दूर राहावे, असं महसूल आणि वन विभाग यांनी कळविले आहे. तसेच तामिळनाडूच्या बोटी देवगड समुद्र किनारी अडकून पडल्याची महिती मिळतं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version