Shaktipeeth Highway: शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, तरी सरकार ठाम; करवीर तालुक्यात 9 सप्टेंबरपासून जमीन मोजणीला सुरुवात

या भागातील जमीनधारणा अगोदरच कमी असून कौटुंबिक विभाजनामुळे दरडोई जमीन कमी झाली आहे; त्यातच आता समृद्ध बागायती जमिनी संपादित होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे.
Shaktipeeth Highway: शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, तरी सरकार ठाम; करवीर तालुक्यात 9 सप्टेंबरपासून जमीन मोजणीला सुरुवात

Shaktipeeth Highway Karveer Taluka Land Survey Kolhapur 2026: प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील 14 गावांतील जमिनींची संयुक्त मोजणी येत्या 9 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुरू होणार आहे. एका बाजूला बागायती जमिनी वाचवण्यासाठी स्थानिक शेतकरी अत्यंत आक्रमक झाले असून या प्रकल्पाला कडाडून विरोध करत आहेत. मात्र, दुसरीकडे भूमी उपअधीक्षक कार्यालयाने 6 ऑगस्ट रोजी जमीनधारकांना मोजणीच्या नोटिसा बजावत सरकार या प्रकल्पावर ठाम असल्याचे आणि माघार घेणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. या भागातील जमीनधारणा अगोदरच कमी असून कौटुंबिक विभाजनामुळे दरडोई जमीन कमी झाली आहे; त्यातच आता समृद्ध बागायती जमिनी संपादित होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे.  

करवीर तालुक्यातील 14 गावांतील मोजणीचे सविस्तर वेळापत्रक  
प्रशासनाने करवीर तालुक्यातील विविध गावांमध्ये मोजणी करण्यासाठी पुढीलप्रमाणे तारीखनिहाय नियोजन निश्चित केले आहे:
9 सप्टेंबर: हसूर दुमाला
10 सप्टेंबर: सडोली दुमाला आणि शिरोली दुमाला
11 सप्टेंबर: भाटणवाडी, वरणगे आणि कसबा बीड  
15 सप्टेंबर: कुडित्रे
16 सप्टेंबर: केर्ली 
17 सप्टेंबर: केर्ले
18 सप्टेंबर: पाडळी बुद्रूक, खुपिरे आणि वाकरे
22 सप्टेंबर: बहिरेश्वर आणि गणेशवाडी

गणेशवाडीत 22 सप्टेंबरला संयुक्त मोजणी; 42 गट क्रमांकांचा समावेश
गणेशवाडी (ता. करवीर) येथील 42 सर्वे/गट क्रमांकांच्या भूसंपादनाच्या नोटिसा उपलब्ध झाल्या असून, तेथे 22 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता मोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये 300, 301, 302, 303, 305, 323, 362, 363, 364, 365, 366, 367, 379, 380, 435, 436, 437, 438, 439, 440, 441, 442, 443, 448, 449, 450, 469, 471, 472, 474, 475, 476, 477, 478, 479, 480, 481, 482, 483, 484 आणि 588 या गट क्रमांकांचा समावेश आहे. ही संयुक्त मोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी भूसंपादन उपजिल्हाधिकारी, भूसंपादन मंडळ आणि जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : 'आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर राजकारण…'; चंद्रशेखर बावनकुळे यांचा राहुल गांधींना टोला

42 खातेदारांच्या जमिनी बाधित; मोजणीच्या दिवशी उपस्थित राहणे अनिवार्य
गणेशवाडीतील 42 खातेदारांना प्रशासनाकडून नोटिसा लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये बाळू बापू माने, छाया बाजीराव पाटील, नम्रता सागर कांबळे, कल्पनाई दिगा पाटकर, माया नामदेव यादव, राजेंद्र किसनजी पाटकर, विद्या अर्जुन देशमुख, सावित्री सागर माने, सुरेश दिगा पाटकर, महादेव सदाशिव पाटकर, रघुनाथ केशव माने, दत्तात्रय विलास शिंदे, पंडित रघु माने आणि संगीता दत्तात्रय माने यांच्यासह इतर जमीनधारकांचा समावेश आहे. भूसंपादन पथकासोबत उपस्थित राहून आपल्या जमिनीचे सीमांकन दाखवण्याचे निर्देश त्यांना देण्यात आले आहेत.

गैरहजर राहणाऱ्यांना इशारा; गणेशवाडीतील मोजणी कळीची ठरण्याची शक्यता
मोजणीच्या ठरलेल्या दिवशी जमीनधारक किंवा त्यांचे प्रतिनिधी गैरहजर राहिल्यास, त्यांना संयुक्त मोजणीची गरज नाही असे गृहीत धरले जाईल. त्यानंतर ती प्रकरणे पुढील कार्यवाहीविना निकाली काढून प्रक्रिया पुढे नेली जाऊ शकते, तसेच भविष्यात पुन्हा मोजणी हवी असल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागेल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध आणि प्रशासकीय इशारा या पार्श्वभूमीवर गणेशवाडीसह करवीर तालुक्यातील मोजणीची ही प्रक्रिया अत्यंत वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana: रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा! 53 हजारांहून अधिक महिलांना ओवाळणी नाही; नेमकं कारण काय?

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version