तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांच्या पार्थिवावर मरिना बीचवरचं अंत्यसंस्कार होणार आहेत. मद्रास हायकोर्टानं परवानगी दिली असून करुणानिधी यांचं स्मारक उभारण्यासही कोर्टाने परवानगी दिली आहे.
एम. करुणानिधी यांच्या अंत्यसंस्काराचा वाद पेटला होता. त्यांच्या पार्थिवावर मरीना बीच येथे अंत्यसंस्कार करण्याला हायकोर्ट परवानगी देणार की नाही हे आज सकाळी आठ वाजता होणाऱ्या सुनावणीकडे लक्ष होतं.
राज्य सरकारने युक्तिवादासाठी आणखी वेळ मागितल्याने या प्रकरणाच्या सुनावणीला कोर्टाने सकाळी आठ वाजेपर्यंत स्थगिती दिली आहे. करुणानिधी यांचे मंगळवारी निधन झाल्यानंतर अंत्यसंस्काराच्या जागेच्या वादावरून रात्री कोर्टात सुनावणी सुरू झाली होती.
सलग पाच वेळेस तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद भूषवणारे करुणानिधी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी काल सायंकाळच्या सुमारास निधन झालं.
कोर्टाने मंगळवारी रात्री या प्रकरणावर सुनावणी सुरू केली होती, परंतु, तामिळनाडू सरकारने आपली बाजू मांडण्यासाठी आणखी वेळ हवा, असे हायकोर्टात सांगितल्याने ही सुनावणी सकाळी ८ वाजेपर्यंत स्धगित करण्यात आली आहे.
करुणानिधींच्या अंत्यदर्शनासाठी अभिनेता रंजनीकांतही पोहोचले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदीही अंत्यदर्शनासाठी दाखल होणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.