कर्नाटकमध्ये पत्रकारासोबत अमानवीय कृत्य; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

कर्नाटकमध्ये पत्रकारासोबत अमानवीय कृत्य; व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

वृत्तसंस्था, कर्नाटक

कर्नाटक राज्यातील हावेरी शहरात पोलिसांकडून एका पत्रकारासोबत अमानवीय कृत्य झाल्याची घटना समोर आलीय. अपघातात मरण पावलेल्या स्थानिक पत्रकाराला पोलिसांनी कचरा व्हॅनमधून रुग्णालयात दाखल केलं. मौनेश पोथराज असं या मृत व्यक्तीचे नाव आहे. रविवारी सकाळी कामावर जात असतांना मौनेशचे आपल्या मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले. आणि मौनेशने एका झाडाला धडक दिली.

या घटनेत मौनेश मृत्यूमुखी पडला. मृत्यूनंतर मौनेशला हावेरीतील हनागल येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेव्हा रुग्णवाहिका पुरविण्याऐवजी पोलिसांनी नागरी प्रशासनाकडून कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी वापरलेल्या ट्रॅक्टरची व्यवस्था केली. मात्र, मौनेशच्या कुटुंबातील सदस्यांनी आणि प्रसारमाध्यमांनी या घटनेचा तीव्र निषेध केलाय. मृतदेहाला कचरा व्हॅनमधून नेत असतानाचा व्हिडिओ सोशल मिडियावर वायरल झाला असून सर्वच स्तरातून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version