एक दोन नव्हे तब्बल 30 जणांना वाचवले पण स्वत:चा जीव गमावून बसले

एक दोन नव्हे तब्बल 30 जणांना वाचवले पण स्वत:चा जीव गमावून बसले

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमध्ये गुरुवारी लागलेल्या आगीत अनेकांनी आपले प्राण गमावले. या आगीत अडकलेले धैर्य आणि विशाल ललानी, हे दोघे धैर्यवान पण कमनशिबी तरुण ठरले. धैर्य आणि विशाल ललानी कमला मिलच्या मोजो हॉटेलला लागलेल्या आगीत अडकले होते.

आग लागल्यावर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बाहेर येण्यात ते यशस्वी ठरले. पण, आगीत अडकलेल्यांना वाचवण्यासाठी ते पुन्हा आत गेले. त्यांनी तब्बल 30 जणांना या आगीतून वाचवले. पण हे करत असतांना या दोघांचा गुदमरून मृत्यू झाला. आगीत अडकलेल्यांना वाचवतांना धैर्य आणि विशाल आपला जीव गमावून बसले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version