दादरा-नगर हवेली पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर विजयी

दादरा-नगर हवेली पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर विजयी

  दादरा नगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने भाजपाविरोधात बाजी मारली आहे. माजी अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी दादरा नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवला आहे.

  शिवसेना उमेदवार कलाबेन डेलकर यांना १ लाख २ हजार मते मिळाली असून त्यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. या पोटनिवडणूकीत भाजपला पराभव पत्कारावा लागला आहे. दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत कलाबेन डेलकर यांनी ४७, ४४७ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे. कलाबेन डेलकर यांनी भाजपचे उमेदवार महेश गावित यांचा सपाटून पराभव केला आहे. दादरा नगर हवेलीचे माजी खासदार महोन डेलकर यांनी मुंबईत आत्महत्या केली होती. यावरुन शिवसेना-भाजपमध्ये मोठे राजकारण रंगले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version