जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मराठी तरुणांना ‘बँक ऑफ इंडिया‘मध्ये नोकरीची संधी आहे.
या बँकेच्या मुंबई झोनने सफाई कर्मचारी पदाच्या जागा भरण्यासंदर्भात परिपत्रक काढलं आहे.
सफाई कर्मचारी पदाच्या 99 जागा भरण्यात येणार आहेत.
इच्छुकांनी आपले अर्ज पोस्टाने पाठवायचे आहे.
अर्ज प्राप्त झाल्यावर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख– 29 ऑगस्ट 2018
पद– सफाई कर्मचारी
जागा– 99
नॉर्थ झोनमध्ये 24 पदं,
साऊथ झोनमध्ये 19 पदं,
नवी मुंबई झोनमध्ये 56 पदं
शिक्षणाची अट-
या पदासाठी इच्छुक उमेदवाराने दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
तसंच स्थानिक भाषेचं म्हणजेच मराठी भाषेचं ज्ञानही आवश्यक आहे.
वयाची अट-
इच्छुक उमेदवाराचं वय 18 ते 26 वर्षांच्या दरम्यान असणं आवश्यक आहे.
अर्ज कसा कराल?
बँक ऑफ इंडिया,
पोस्ट बॉक्स नं: 238, मुंबई
जीपीओ, मुंबई- 400001
या पदासाठी अर्ज करण्याकरीता कोणतंही शुल्क घेण्यात येणार नाही.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.