“नरेंद्र मोदी ‘नमक हराम’!” जिग्नेश मेवाणीची घसरली जीभ

“नरेंद्र मोदी ‘नमक हराम’!” जिग्नेश मेवाणीची घसरली जीभ

“उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मजुरांना गुजरातमध्ये मारहाण करण्यात आली. त्यामुळे अनेक मजूर गुजरात सोडून पळाले. मात्र या घटनेविषयी नरेंद्र मोदी एक अवाक्षरही बोलायला तयार नाही. या नमकहराम माणसाला ओळखा…” असं वक्तव्य गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी केलंय.

25 ऑक्टोबरला एका रॅलीदरम्यान बोलताना मेवाणी यांची जीभ घसरली आणि त्यांनी पंतप्रधानांची संभावना थेट ‘नमकहराम’ या शब्दांत केली. ‘यूपी, बिहारमधील लोक हे आपले देशबांधवच आहेत, हे मोदींनी पुढे येऊन सांगायची गुजराती समाजाला समजवायची गरज होती. मात्र मोदींनी तसं केलं नाही. म्हणून या नमकहराम माणसाला ओळखा.’ असे शब्द मेवाणी यांनी वापरले.

मेवाणी हे कट्टर मोदी विरोधक म्हणून ओळखले जातात. 1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगाव येथे झालेल्या ‘एल्गार परिषदे’त जिग्नेश मेवाणी यांचा सहभाग होता.

जिग्नेश मेवाणी यांच्या प्रमाणेच महाराष्ट्रात आमदार प्रणिती शिंदे यांचीही जीभ घसरली आणि त्यांनीही मोदींना डेंग्यूचा डांस असं संबोधलं.

तर नवी दिल्ली येथे सीबीआय मुख्यालयाबाहेर निदर्शनं करताना राहुल गांधी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘चौकदार चोर है’ अशी घोषणाबाजी केली.

एकूणच मोदी विरोधक आक्रमक झालेले दिसून येऊ लागले आहेत. लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र त्यांनी भाषा जपून वापरायला हवी, एवढं मात्र खरं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version