जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे. देशात सरकारकडून केवळ घोषणाबाजी होतेय. मात्र, अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. असा आरोप करत पाटील यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय.
शेतकऱ्यांना केवळ दीड लाखांपर्यंत कर्जमाफी देऊन वरील रक्कम शेतकऱ्यांना आधी भरायला लावतेय. यामुळे ही बँकांच्या वसुलीची योजना असल्याचाही आरोप जयंत पाटलांनी केलाय.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.