ओमायक्रॉन विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणसेवा ३१ जानेवारीपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएकडून स्थगिती पत्रक जारी करण्यात आले आहे. या पत्रकात भारतात येणाऱ्या आणि भारतातून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांना स्थगित करण्यात आले आहे.
ओमायक्रॉन विषाणूने जगभराची चिंता वाढवली आहे. तसेच ओमायक्रॉन विषाणूचे रुग्ण भारतत ठिकठिकाणी आढळले. त्यामुळे खबरदारी घेत डीजीसीएकडून स्थगिती पत्रक जारी करण्यात आले. येत्या १५ डिसेंबरपासून ३१ जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांच्या उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे. कोरोनाच्या जागतिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय उड्डाणांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.