टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसरी टी-२० मंगळवारी खेळण्यात येणार आहे. ही टी-२० इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये खेळण्यात येणार आहे.
पावसाच्या व्यत्ययामुळे पहिली टी-२० मॅच रद्द करावी लागली. त्यामुळे ३ मॅचच्या सीरिजमध्ये ०-० अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता या टी-२० सीरिजमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे.
इंदूरवर या आधी २०१७ साली टीम इंडिया आणि श्रीलंकेत टी-२० मॅच खेळली गेली होती. या मॅचमध्ये टीम इंडियाच्या बॅट्समननी धडाकेदार खेळी केली होती.
या सामन्यात ओपनर रोहितने ३५ बॉलमध्ये शतक ठोकलं होतं.
रोहितने ४३ बॉलमध्ये ११८ धावांची खेळी केली होती. तसेच केएल राहुलने ४९ बॉलमध्ये ८९ रन्स केल्या होत्या.
या दोघांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने २० ओव्हरमध्ये २६० धावा केल्या होत्या. टीम इंडियाने हा सामना ८८ धावांनी जिंकला होता.
दरम्यान पहिली टी-२० मॅच रद्द झाली. त्यामुळे आता खऱ्या अर्थाने या सीरिजमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. ही सीरिज जिंकण्यासाठी दोन्ही संघाना सलग उर्वरित २ मॅच जिंकाव्या लागतील.
तसेच टीम इंडियामध्ये दुखापतग्रस्त शिखर धवन आणि जस्प्रीत बुमराहचे आगमन झाले आहे.
त्यामुळे या दोंघाच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.
श्रीलंकेला आतापर्यंत भारता विरुद्ध एकही टी-२० मालिका जिंकता आलेली नाही.
आतापर्यंत टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात एकूण ६ टी-२० सीरिज खेळल्या गेल्या आहेत.
यामध्ये टीम इंडियाने ५ मालिका जिंकल्या आहेत. तर एक सीरिज बरोबरीत सुटली.
टीम इंडिया आणि श्रीलंकेत आतापर्यंत एकूण १६ टी-२० मॅच खेळल्या गेल्या आहे. यात टीम इंडियाने एकूण ११ मॅच जिंकल्या आहेत.
तर ५ मॅच श्रीलंकेला जिंकण्यास यश आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.