Monsoon Update : भारतीय मान्सूनवर चीनमधील ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचं सावट; महाराष्ट्रासह ‘या’ 23 राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट

देशातील विविध राज्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवसांत मान्सूनची स्थिती कशी राहील याबाबत हवामान विभागाने पुढील अंदाज वर्तवला आहे
Monsoon Update : भारतीय मान्सूनवर चीनमधील ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचं सावट; महाराष्ट्रासह ‘या’ 23 राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट

India Monsoon Update: ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच देशातील बहुतांश राज्यांमध्ये मॉन्सून अत्यंत सक्रिय झाला असून अनेक भागांत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट रोजी देशातील तब्बल 23 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राजधानी दिल्ली आणि एनसीआर परिसरामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील. या दरम्यान कमाल तापमान 34 अंश तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून हवेतील आर्द्रता 75 ते 85 टक्के राहील. 14 ऑगस्ट रोजी तापमानात आणखी घट होऊन ते 33 अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान अन् बंगालमध्ये पावसाचा जोर
देशातील विविध प्रदेशांमध्ये पुढील 4 ते 5 दिवसांत मान्सूनची स्थिती कशी राहील याबाबत हवामान विभागाने पुढील अंदाज वर्तवला आहे:
– उत्तर प्रदेश व बिहार: पूर्व उत्तर प्रदेशात 13 ऑगस्ट रोजी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल, तर 14 ते 18 ऑगस्ट दरम्यान पावसाचा जोर आणखी वाढेल. बिहारमध्ये 12 ते 13 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी आणि 14 ते 18 ऑगस्ट दरम्यान बहुतांश जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
– पश्चिम बंगाल: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे (Cyclonic Circulation) पूर्व व पश्चिम मिदनापूर, दक्षिण 24 परगणा, बांकुडा आणि पुरुलिया भागात 15 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस सुरूच राहील. दार्जिलिंग, जलपाईगुडी आणि कलिम्पोंग यांसारख्या उत्तर बंगालमधील जिल्ह्यांतही अतिवृष्टीची शक्यता आहे.
– राजस्थान: राजस्थानमध्ये पुढील 24 तासांत जयपूर, भरतपूर, अजमेर, कोटा आणि उदयपूर विभागात जोरदार पाऊस अपेक्षित आहे. मात्र 14 ऑगस्टनंतर जोधपूर व अजमेर भागात पावसाचा जोर काहीसा कमी होईल.

हिमाचल, उत्तराखंड ते महाराष्ट्रापर्यंत 'या' राज्यांमध्ये पावसाची हजेरी
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या मैदानी भागात काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, विदर्भ, कोकण, गोवा, गुजरात, झारखंड, सिक्कीम, अंदमान आणि निकोबार बेटसमूह तसेच आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांमध्येही मुसळधार सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा – Jayakwadi Dam Water : नाथसागरात 93 टक्क्यांपेक्षा जास्त पाणी; आवक मंदावल्याने गोदावरीतील पाण्याचा विसर्ग बंद

चीन सळो की पळो करून सोडणाऱ्या 'डॉल्फिन' चक्रीवादळाचा भारतालाही फटका
एकीकडे देशात पावसाचा इशारा दिला जात असतानाच, दुसरीकडे प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या अत्यंत शक्तिशाली 'डॉल्फिन' चक्रीवादळाने ऑगस्ट 2026 मध्ये चीनच्या पूर्व किनारपट्टीवर भीषण धडक दिली आहे. तासाला 151 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे चीनमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून 300000 पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले आहे. सुमारे 4000 किलोमीटर अंतरावर घडलेल्या या खगोलीय घटनेचा थेट परिणाम भारताच्या मान्सूनवर होताना दिसत आहे.

बंगालच्या उपसागरातील आर्द्रता शोषली; मान्सूनच्या ढगांवर परिणाम
हवामान तज्ज्ञांच्या मते, 'डॉल्फिन' हे चक्रीवादळ स्पंजप्रमाणे वातावरणातील सर्व ओलावा आणि आर्द्रता स्वतःच्या केंद्राकडे खेचून घेत आहे. त्यामुळे भारताजवळील बंगालच्या उपसागरातील मान्सून निर्मितीची प्रक्रिया मंदावली असून तेथील आद्रतेचे प्रमाण घटले आहे. परिणामी कमी दाबाचा पट्टा तयार होण्यात अडथळा येत असून भारताच्या मध्य आणि पश्चिम भागात ढगांचे प्रमाण कमी झाले आहे. पूर्ण दुष्काळ पडणार नसला तरी ऑगस्टच्या उर्वरित दिवसांत मध्य व पश्चिम भारतात पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे, तर पूर्व आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मान्सून सक्रिय राहील.

हेही वाचा – Typhoon Dolphin : 1000 हून अधिक उड्डाणे रद्द, 4 लाख नागरिकांचे स्थलांतर… 'या' देशाला डॉल्फिन’ चक्रीवादळाचा तडाखा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version