न्यूयॉर्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक

न्यूयॉर्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक

जय महाराष्ट्र वेब न्यूज, न्यूयॉर्क

भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात ‘इंडीया डे परेड’चं आयोजन करण्यात आलं.
19 ऑगस्ट रोजी झालेल्या या संचलनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

 


दरवर्षी 26 जानेवारीला राजपथावर ज्याप्रमाणे संचलन होते, तशाच प्रकारचे संचलन 19 ऑगस्ट रोजी न्यूयॉर्क मध्ये करण्यात आले.
या इंडिया डे परेडमध्ये भारतीय संस्कृती आणि विविध देखावे तसंच चित्ररथांचे संचलन झाले. भारतीय नृत्यांचं सादरीकरणही करण्यात आले.
यावर्षी प्रथमच छत्रपती फाऊंडेशन न्युयॉर्क च्या वतीने या इंडिया परेड मध्ये शिवछत्रपती कीर्तीरथ सादर करण्यात आला.

ही मिरवणूक पाहाण्यासाठी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. ठिकठिकाणी लोक उभे राहून हे संचलन पाहात होते.

 

 

अमेरिकेमध्ये वास्तव्यास असलेले सर्व प्रांतांतील भारतीय लोक या संचलनात मोठ्या उत्साहात सहभागी झाले. 
साता समुद्रापार अमेरिकेमध्येही छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयजयकार झाला.

 

संबंधित बातम्या

न्यूयॉर्कमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक!

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version