Solapur Crime : सोलापुरात मध्यरात्री मर्डर, झोपेत पाय लागल्याचं क्षुल्लक कारण, आरोपीने तरुणाच्या डोक्यात दगड घातला

सोलापुरातील मीनाक्षी नगर परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. झोपेत पाय लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर थेट खुनात झाले.
Solapur Crime : सोलापुरात मध्यरात्री मर्डर, झोपेत पाय लागल्याचं क्षुल्लक कारण, आरोपीने तरुणाच्या डोक्यात दगड घातला

सोलापुरातील मीनाक्षी नगर परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. झोपेत पाय लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचे रुपांतर थेट खुनात झाले. महेश गुरुसिद्धप्पा सावळतोटे या तरुणाच्या डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या करण्यात आली. मध्यरात्री तेलगू शाळेजवळील मोकळ्या जागेत महेश झोपला असताना आरोपी सोमनाथ नागनाथ जवळकोठे याचा पाय लागल्याने दोघांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला.

हा वाद पुढे भांडणात बदलला आणि संतापाच्या भरात सोमनाथने महेशच्या डोक्यात दगड घालून हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या महेशचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृत महेश मजुरीचे काम करत होता. दोघांनाही दारूचे व्यसन असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी सोमनाथ जवळकोठे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version