सोनई हत्याकांड प्रकरणी 6 दोषींना आज शिक्षा सुनावणार

सोनई हत्याकांड प्रकरणी 6 दोषींना आज शिक्षा सुनावणार

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

सोनई हत्याकांड प्रकरणी 6 जणांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवलं होतं त्या 6 दोषींना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2013 रोजी अहमदनगरमधील सोनई या गावी प्रेमप्रकरणातून 3 जणांची हत्या करण्यात आली होती. परिस्थितीजन्य पुराव्यांअभावी कोणत्याही प्रत्यक्षदर्शी शिवाय हा खटला सरकारी वकिलांना चालविला होता. यात 53 साक्षीदारांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले होते.

दरम्यान, दोषी प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक नवगिरे आणि संदीप कुऱ्हे यांच्यावरील दोष सिद्ध झाले होते. तर, आरोपी अशोक रोहिदास फलके ला पुराव्याअभावी निर्दोष ठरवल होतं.

दोषी आरोपींनी सचिन सोहनलाल घारु (वय 23),संदीप राजू धनवार(वय 24) आणि राहुल कंडारे (वय 26) (गणेशवाडी, सोनई,तालुका नेवासा) या तिघांची हत्या केली होती.

दरम्यान, दोषी आरोपींचे वकील एस एस आदास यांनी कमीत कमी शिक्षेची मागणी केली. एका आरोपीचं वय खूपच कमी आहे, तर इतर आरोपीचं वय जास्त आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती पाहता कमीत कमी शिक्षा व्हावी, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी केली.

संपूर्ण प्रकरणाचा इतिहास

सचिन घारु या मेहतर समाजातील तरुणाचं सवर्ण मुलीवर प्रेम होतं. ते लग्न करणार होते. मात्र सवर्ण कुटुंबाने कट रचून 1 जानेवारी 2013 रोजी सचिनची हत्या केली. यावेळी सचिनच्या हत्येची चाहुल लागल्याने कुटुंबाने सचिनचे मित्र संदीप राजू धनवार आणि राहुल कंडारे यांचीही हत्या केली होती.

नंतर सचिनच्या मृतदेहाचे तुकडे करुन कूपनलिकेत टाकले. तर आरोपींनी संदीप धनवार आणि राहुल कंडारे यांचे मृतदेह कोरड्या विहिरीत पुरले होते. याप्रकरणी पोलिसांनी प्रकाश विश्वनाथ दरंदले, रमेश विश्वनाथ दरंदले, पोपट विश्वनाथ दरंदले, गणेश पोपट दरंदले, अशोक रोहिदास फलके, अशोक नवगिरे, संदीप कुऱ्हे यांना अटक केली होती.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version