आंबेनळी घाट परिसर पुन्हा एकदा एका गंभीर गुन्हेगारी घटनेमुळे हादरला आहे. अलिबाग येथील एका नराधम युवकाने स्वतःच्या सख्ख्या आजीचा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या हव्यासापोटी नातेवाईक महिलेचा खून करून तिचा मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत टाकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सुनंदा पाटील असे मृत महिलेचे नाव असून ती अलिबाग तालुक्यातील सारळ येथील रहिवासी आहे. या प्रकरणी मांडवा सागरी पोलिसांनी तिनविरा येथील अनदर्श शेडगे आणि रितेश लोहार या दोघा तरुणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. या महिलेकडील सोन्याचे दागिने काढून घेण्याकरिता या दोघांनी तिला घरी बोलावून घेतले आणि निर्जन स्थळी नेवून तिचा खून केला.
पोलिसांनी सर्च आणि रेस्क्यू टीमच्या मदतीने खोल दरीतून या महिलेचा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून आंबेनळी घाट पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच या घाटात भीषण अपघात होऊन आठ युवकांचा मृत्यू झाला होता. त्या घटनेची आठवण अद्याप ताजी असतानाच आता खून प्रकरण समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.