जम्मू-काश्मीरच्या पूॅंछमध्ये IED स्फोट; एक जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या पूॅंछमध्ये IED स्फोट; एक जवान शहीद

लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीला काही तास असताना जम्मू-काश्मीरच्या भारत-पाक सीमारेषेजवळ IED स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटामुळे एक भारतीय जवान शहीद झाला असून सात जवान जखमी झाली आहे. LOC जवळील पूॅंछ जिल्ह्यातील मेंढर सेक्टर येथे हा स्फोट झाल्याचे समजते आहे.

नेमकं काय घडलं ?

जम्मू-काश्मीरच्या पूॅंछ जिल्ह्यातील मेंढर येथे दुपारी IED स्फोट झाला आहे.

या स्फोटात सुरक्षा दलाचे जवान गस्ती घालत होते.

यावेळी IEDचा स्फोट झाल्यामुळे सुरक्षा दलाच्या पथकाचे आठ जवान गंभीर जखमी झाले.

या जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र एका जवानाचे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे समजते आहे.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version