दावोसमध्ये भरघोस गुंतवणूक !

दावोसमध्ये भरघोस गुंतवणूक !

स्वित्झर्लंड येथील दावोस येथे ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’च्या विद्यमाने आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारीच दावोस येथे रवाना झाले. या परिषदेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रामध्ये सुमारे ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक करण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आल्याचे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. या माध्यमातून सुमारे १० हजार तरुणांना रोजगार मिळणार असल्याचेही सामंत म्हणाले. जगभरातल्या देशांसाठी आणि उद्योगपतींसाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम महत्त्वाची मानली जाते.

या कंपन्यांसोबत करार करण्यात आला

ग्रीनको एनर्जी प्रोजेक्ट्स प्रा.ली. – १२ हजार कोटींची गुंतवणूक
बर्कशायर हाथवे होम सर्व्हिसेस ओरिएन्डा इंडिया – १६ हजार कोटींची गुंतवणूक
आयसीपी इन्व्हेस्टमेंट/ इंडस कॅपिटल – १६ हजार कोटींची गुंतवणूक
रुखी फूड्स – २५० कोटींची गुंतवणूक
निप्रो फार्मा पॅकेजिंग इंडिया प्रा.लि. – १६५० कोटींची गुंतवणूक
या कंपन्यांसोबत सामंजस्य कारार करण्यात आला आहे.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, टी. कृष्णा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन व सर्व संबंधित उपस्थित होते. या दावोस परिषदेला सुरूवात झाली. या परिषदेत विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात येतात. तसेच राज्यातील देशातील गुंतवणुकीच्या संदर्भात चर्चा होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version