लोकलच्या पाससाठी आता घरबसल्या नोंदणी! असा मिळवा ई पास

लोकलच्या पाससाठी आता घरबसल्या नोंदणी! असा मिळवा ई पास

कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकलमधून प्रवास करण्यासाठीचा पास देण्याची ऑफलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर आता ऑनलाईन ई-पास सुविधादेखील राज्य शासनाने सुरू केली आहे. https://epassmsdma.mahait.org याद्वारे ‘युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास’ घरबसल्या उपलब्ध होणार आहे. त्यामुळे लस घेतल्याच्या नोंदणीसाठी आता रांग लावायची गरज नाही.

 

असा मिळवा ई पास.

पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org ही वेब लिंक उघडावी.

त्यावर Travel Pass for Vaccinated Citizens यावर क्लिक करावे.

कोविड लसीकरणासाठी नोंदविलेलाच मोबाइल क्रमांक नमूद करावा.

मोबाइलवर एसएमएसद्वारे मिळालेला ओटीपी नमूद करा .

लाभधारकाचे नाव, मोबाइल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक असा तपशील समोर दिसेल.

त्यामध्ये पास निर्माण करा या पर्यायावर क्लिक करावे.

अर्जदाराचा तपशील, कोविड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याचा दिनांक असा सर्व तपशील आपोआप दिसेल.

या तपशिलामध्ये सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे.

ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील ४८ तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास करिता एसएमएसद्वारे लिंक प्राप्त होईल,

लिंक प्राप्त झाल्यानंतर ई-पास मोबाइलमध्ये जतन करा .

रेल्वे तिकीट खिडकीवर सादर करावा, त्याआधारे रेल्वे पास प्राप्त करता येईल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version