Hingoli News : कागदोपत्री सगळं योग्य… पण प्रत्यक्षात घडलं भयंकर; शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, नेमकं काय घडलं?

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात वीजेचा धक्का लागून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पार्डी पोहतर या शिवारात ही संपू्र्ण घटना घडली. महादेव पोहकर असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
Hingoli News : कागदोपत्री सगळं योग्य… पण प्रत्यक्षात घडलं भयंकर; शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, नेमकं काय घडलं?

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात वीजेचा धक्का लागून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पार्डी पोहतर या शिवारात ही संपू्र्ण घटना घडली. महादेव पोहकर असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

काम सुरू होताच विजेचा झटका
मिळालेल्या माहितीनुसार, पार्डी पोहकर शिवारातील रोहित्राजवळ वीजेची एक वायर तुटली होती. हीच वायर जोडण्यासाठी महावितरणकडून परमिटही घेण्यात आले होते. त्यानुसर दुरुस्तीचे काम सुरु करण्यापूर्वी वीजप्रवाह बंद ही करण्यात आलेला होता. मात्र, दुरुस्तीचे काम सुरु असतानाच काही क्षणात अचानकच वीजप्रवाह हा सुरु झाला. त्यामुळे शेतकरी महादेव पोहकर यांना विजेचा जोरदार धक्का बसला. याच दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

हेही वाचा-Paithan News: मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा चालवला, पण अचानक उचललं टोकाचं पाऊल; पैठण तालुक्यातील घटनेने हळहळ

महादेव पोहकर यांच्या मृत्यूनंतर संबंधित परिसरातील शेतऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरणच्या कारभारावर आणि वीजप्रवाह बंद करण्याच्या या दोन्ही प्रक्रियेवर शेतकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहे. महादेव पोहकर यांच्या झालेल्या मृत्यूला फक्त महावितरणचा हलगर्जीपणाच जबाबदार असल्याचा आरोप करत अनेक संतप्त शेतकऱ्यांनी हिंगोली-सेनगाव या मार्गावर रास्तारोको करत आंदोलन केले.

संतप्त नागरिकांचा रास्तारोको
या आंदोलनामुळे हिंगोली-सेनगाव या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. या प्रकरणातील संबंधित असलेल्या दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आंदोलक शेतऱ्यांनी केली आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि मृत शेतकऱ्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणीही करण्यात आले असून ऊर्जा मंत्र्यांनी देखील या घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. रात्री उशिरापर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version