Helicopter Emergency Landing: हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; वैमानिकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

कोणताही मोठा धोका न पत्करता वैमानिकाने समयसूचकता दाखवत निलज आणि बिसारी गावाच्या सीमेवरील तलावाकाठची मोकळी जागा निवडून हेलिकॉप्टर सुरक्षितपणे जमिनीवर उतरवले.
Helicopter Emergency Landing: हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग; वैमानिकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

Mohadi Helicopter Emergency Landing: भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात एका खासगी हेलिकॉप्टरला तांत्रिक अडचणींमुळे अचानक आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करावे लागले. हवेत उड्डाण करत असताना ‘व्हीटी-पीबीएन’ (VT-PBN) क्रमांकाच्या या हेलिकॉप्टरच्या यंत्रणेत तांत्रिक बिघाड निर्माण होऊन ‘वीक सिग्नल’ मिळण्यास सुरुवात झाली. कोणताही मोठा धोका न पत्करता वैमानिकाने समयसूचकता दाखवत निलज आणि बिसारी गावाच्या सीमेवरील तलावाकाठची मोकळी जागा निवडून हेलिकॉप्टर सुरक्षितपणे जमिनीवर उतरवले.

लँडिंग पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी; वैमानिकाचे सर्वत्र कौतुक
आपल्या गावाशेजारी अचानक हेलिकॉप्टर उतरल्याचे पाहून परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे आणि अचूक निर्णयामुळे मोठा अपघात टळल्याने स्थानिक प्रशासन आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

हेही वाचा – Weather Update : बंगालच्या उपसागरात हालचाली वाढल्या, महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

तांत्रिक तपासणीनंतर हेलिकॉप्टरची पुन्हा सुरक्षित उड्डाण
लँडिंगनंतर तांत्रिक पथकाकडून हेलिकॉप्टरमधील त्रुटींची तातडीने पाहणी करण्यात आली. सर्व तांत्रिक चाचण्या आणि आवश्यक कायदेशीर पूर्तता पूर्ण झाल्यानंतर, काही तासांतच या हेलिकॉप्टरने आपल्या पुढील प्रवासासाठी पुन्हा सुरक्षितपणे उड्डाण केले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version