मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस

मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस

मुंबई शहर,पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरात कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस पडत आहे. आज रविवार असल्याने मुंबईकर सन डे ला फन डे करण्याच्या विचारात असतानाच पावसाने त्यांच्या आनंदावर विरजण घातलेलं पाहायला मिळत आहे. गणेशोत्सव सुरू झाल्यापासून पडणारा पाऊस बाप्पा गेल्यावरही पडत असल्याने मुंबईकर आता मात्र या पावसाला वैतागले आहेत.

मुंबईसह उपनगरात मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अंधेरी, गोरेगाव, ठाणे, कल्याण, डोंबिवलीत मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर नालासोपारा, विरार मध्ये पाणी साठण्यास सुरूवात झाली आहे.

णेशोत्सव सुरू झाल्यापासून पडणारा पाऊस बाप्पा गेल्यावरही पडत असल्याने मुंबईकर आता मात्र या पावसाला वैतागले आहेत. पावसाची रिपरिप न थांबल्यास याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

नालासोपारा, वसई व विरारच्या गालानगर, सेंट्रलपार्क, तुलिंजरोड, आचोले, अल्कापुरी, विजय नगर, मानवेलपाडा, विवा महाविद्यालय, दिवाणमान, एव्हरशाईन सारख्या सखल भागात पुन्हा पाणी साचलं  आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version