दात चमकदार बनवण्यासाठी करा हे सोपे उपाय

दात चमकदार बनवण्यासाठी करा हे सोपे उपाय

मोत्यासारखे चमकदार दात हे सौंदर्याचं लक्षण मानलं जातं. आपले दात पांढरेशुभ्र आणि चमकदार असावेत, असं प्रत्येकाला वाटत असतं. मात्र त्यासाठी नेमके उपाय काय करावेत, याचं ज्ञान नसतं. बहुतेकदा जास्तीत जास्त टूथपेस्ट घेऊन त्याने जास्तवेळा दात घासले, की दात आणखी शुभ्र होतील, असा सर्वसाधारण गैरसमज आहे. मात्र त्यात काही तथ्य नाही. मग टूथपेस्ट नेमकी किती वापरावी?

डेंटिस्टच्या मते,

  • जास्त टूथपेस्ट वापरणंही हानीकारक असतं.
  • साधारणतः मटारीच्या दाण्याइतकीच टूथपेस्ट ब्रशवर घेऊन त्याने दात स्वच्छ करावेत.
  • लहान मुलांचे दात स्वच्छ करण्यासाठी तर तांदुळाच्या दाण्याइतकी कमी टूथपेस्ट वापरावी.
  • जास्त टूथपेस्टचा वापर केल्यास लहान मुलांना फ्लोरोसिस हा आजार होऊ शकतो.
  • फ्लोरोसिसमुळे दातांवर भुरकट रंगाचे डाग तयार होतात.
  • प्रौढांना मात्र फ्लोरोसिसचा धोका नसतो.
  • दात घासण्यासाठी वापरण्यात येणारा ब्रश नेहमी सॉफ्ट असावा.
  • म्हणजेच, ब्रशचे ब्रिसल्स हे जास्त कडक नसावेत. अन्यथा त्याने दातांवरील एनॅमल कमी होण्याचा धोका असतो.
  • त्यामुळे सॉफ्ट ब्रिसल्सचा टूथब्रश आणि योग्य प्रमाणात टूथपेस्टचा वापर केल्यास दातांना फ्लोराइड मिळतं आणि त्यामुळे दात चमकदार बनतात.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version