‘भाजपाने हिणवलेला ‘तो’ सर्वांचा बाप’

‘भाजपाने हिणवलेला ‘तो’ सर्वांचा बाप’

कर्नाटक निवडणुकीच्या रणसंग्रामात तूर्तास काँग्रेसला बहुमत मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आतापर्यंत हाती आलेला निकाल पाहता काँग्रेस आघाडीवर आहे. दरम्यान, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपावर टीकास्त्र सोडत काँग्रेस नेते राहुल गांधींचे कौतुक केलं आहे.

कर्नाटक निवडणुकीत भाजपाने जोरदार प्रचार केला होता. यात नरेंद्र मोदी यांनी 19 सभा रोड शो केले होते. मात्र भाजपाला अपेक्षित यश मिळताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
‘महाविकास आघाडीसाठी शुभ संकेत आहे. कर्नाटकचे निकाल हे एकूणच ‘मोदी है तो मुमकीन है’ असे म्हणणाऱ्या सगळ्या भक्तजनांसाठी ही चपराक आहे. पण असं म्हटल्यावर ज्यांची उमेद जात होती त्या सर्वांसाठी हा ऊर्जादायी निकाल आहे. पंतप्रधान मोदी यांनी प्रचंड नकारात्मक राजकारण अन् ऊर्जा निर्माण केली होती. त्याला सगळे कंटाळले आहेत. कर्नाटकमधील निकालातील विजयाची ऊर्जा ही महाराष्ट्रात दिसेल असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला आहे.

तर, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम कर्नाटकात दिसणार नाही असं म्हटलं जात होतं. ज्या राहुल गांधींना भाजपाच्या स्लीपर सेल ने पप्पू म्हणून हिणवलं ते राहुल गांधी हे सर्वांचे बाप निघाले. राहुल गांधी यांची इमेज खराब करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधीच काय तर नेहरू गांधी यांना देखील बदनाम करण्याचा प्रयत्न केला. ‘पप्पू पास नही हो गया पप्पू मेरिट मे आ गया’, असंही अंधारे म्हणाल्या आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version