मुंबई ,२९ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरने हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. मृणाल चे चाहते जगभरात पसरलेत. दरम्यान मृणाल ठाकूरने नुकतीच एक नवी गाडी खरेदी केली आहे. या गाडीसोबत तिचा मुंबईच्या विमानतळावरील एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.
मृणाल अलीकडेच मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिसली. यावेळी ती तिच्या नव्या मर्सिडीज बेंज एस-क्लास 450 याला गाडीत आली होती. मृणालच्या या लक्झरी सेडान गाडीची किंमत २ कोटी आहे.मर्सिडीज बेंझ एस क्लास लक्झरी सेडान व्यतिरिक्त, मृणालकडे होंडा अकार्ड आणि टोयोटो फॉर्च्युनरसारख्या गाड्या आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.