Rohit Pawar : "तुम्ही स्वार्थी की अजितदादा प्रेमी" रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेलांना सवाल; पोस्ट करत म्हणाले,

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर, त्याचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांचा अपघात नसून तो घातपात असल्याचे अनेक दावे केले.
Rohit Pawar : "तुम्ही स्वार्थी की अजितदादा प्रेमी" रोहित पवारांचा प्रफुल्ल पटेलांना सवाल; पोस्ट करत म्हणाले,

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर, त्याचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील नेते रोहित पवार यांनी अजित पवार यांचा अपघात नसून तो घातपात असल्याचे अनेक दावे केले. नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेतून रोहित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं. त्यांनी असं म्हटलं होत की, अपघाताच्या दिवशी अजित पवार रस्त्याने मुंबईहून बारामतीला जाणार होते. मात्र पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या फाईलवर सही करायची होती, म्हणून त्यांना उशिरापर्यंत मुंबईत थांबाव लागलं आणि विमानाने प्रवास करावा लागला. रोहित पवारांनी केलेल्या पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या उल्लेखामुळे त्यांचा रोख प्रफुल पटेलांकडे असल्याचे समजले. एवढचं नव्हे तर रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडियावर प्रफुल पटेलांना टॅग करत आव्हान दिले आहे. 

हेही वाचा- Sunetra Pawar: अजित पवारांच्या अपघातावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया; म्हणाल्या ‘ सत्य बाहेर येण्यासाठी… ‘
यावेळी रोहित पवार ट्वीट करत म्हणाले की, “प्रफुल पटेल जी (माजी केंद्रीयनागरी उड्डाणमंत्री) आपणास विनंती आहे की, अजितदादांच्या अपघाताला / घातपातला कारणीभूत असलेल्या VSR कंपनीच्या मालकाचा मुलगा रोहित सिंग याच्या राजस्थानमध्ये पार पडलेल्या लग्नात आपण गेला होतात का? गेला असालच तर त्या लग्नात इतर कोण नेते होते आणि कुठल्या पक्षाचे होते हे तुम्हाला माहीतच असेल ते आपण लोकांना सांगावं.. तुम्ही स्वार्थी आहात की अजितदादा प्रेमी आहात, हे महाराष्ट्राला दाखवून द्या… उद्या पत्रकार परिषद घेऊन याबाबत स्पष्टीकरण द्याल, ही अपेक्षा..!”

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version