हनुमान जन्मस्थान वाद कायम

हनुमान जन्मस्थान वाद कायम

नाशिकची मंगळवारची शास्रार्थ सभा वादात सापडली. सभेत साधू महंत हमरी तुमरीवर आल्याचे पाहायला मिळाले. सभेला उपस्थित असलेल्या गोविंदानंद महाराज आणि नाशिकच्या साधू महंतांमध्ये मध्ये वाद झाला. त्यामुळे हनुमान जन्मस्थळाबाबतचा तोडगा काढण्यासाठी आयोजित केलेली मंगळवारची सभा वादाने रंगली. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाबाबतचा वाद वाढत चालला आहे. त्यामुळे हनुमान जन्मस्थळाबाबतचा तोडग काढण्यासाठी केलेली सभा गोंधळानंतर गुंडाळण्यात आली. याप्रसंगी पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वातावरण निवळले.

नाशिकच्या अंजनेरी येथील हनुमान जन्मस्थळाबाबत काही दिवसांपासून वाद सुरू आहे. हा वाद मिटवण्यासाठी नाशिक व कर्नाटक येथेही किष्किंदा नगरिने साधू महंतांनी शास्त्रार्थ सभेचे आयोजन केले होते. मात्र सकाळी सभा सुरू होण्यापुर्वीच बंद पडली. या ठिकाणी साधू मंहतांकडून बसण्यावरून वाद झाला. यावर रामजन्मभूमिचे प्रधानाचार्य यांनी देखील दिलगिरी व्यक्त करत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.

अखेर सभास्थळी अनेक साधू महंत उपस्थित राहिले साधू महंत, लोक प्रतिनिधी या सर्वांनी उपस्थिती दाखवत हनुमान जन्मस्थळाबात तोडगा काढण्यासाठी एकत्र सभेला सुरूवात केली. मात्र काही वेळानंतर पुन्हा वादाची ठिणगी उडली. त्यामुळे सभेचा मुद्दा बाजूला राहून काही काळ गोंधळ सुरू झाला. त्यानंर पोलिसांनी हस्तक्षेप करून सभा संपवली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version