जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कॉ. गोविंद पानसरेंच्या पतसंस्थेतील भाकपमध्ये म्हणजेच भारतीय कम्युनिष्ट पक्षात घोटाळा झाल्याचा आरोप सनातन संस्थेशी संलग्न असणाऱ्या हिंदू जनजागृती समितीनं केला आहे.
या पतसंस्थेत भारतीय कम्युनिस्टच्या नावानं 45 लाख 51 हजारांची बेहिशेबी रक्कम ठेवली असल्याचा आरोप देखील करण्यात आला.
या रकमेची माहिती निवडणूक आयोगाला दिलेली नसून या काळ्या पैशाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी हिंदू जनजागृती समितीनं केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.