मुंबईतील प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळावर आता सरकारचं नियंत्रण असणार आहे. पारदर्शक कारभारासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
दर्शन रांगेबाबत ही समिती धोरण ठरवणार तसंच दागिने, पैशांची मोजणी धर्मादाय आयुक्त करणार आहे. यामुळे कार्यकर्त्यांकडून मिळणाऱ्या मुजोर वागणुकीला चाप बसेल अशी अपेक्षा आहे.
गणेशोत्सवादरम्यान १८ सप्टेंबरला लालबागच्या राजासमोर पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती. म्हणूनच मंडळाच्या विरोधात आलेल्या तक्रारींची दखल घेत एकंदर परिस्थितीची पाहणी केली आणि काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
ही शान कुणाची?…लालबागच्या राजाची!
लालबागच्या द्वारी… कार्यकर्त्यांची अशी दादागिरी
गणेशोत्सवात खड्डे करणाऱ्या मंडळांना पालिकेचा दणका ! लालबागचा राजा पहिल्या नंबरवर
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.