तुमच्या फोनवर दररोज येणारा ‘तो’ मेसेच होऊ शकतो डिलीट

तुमच्या फोनवर दररोज येणारा ‘तो’ मेसेच होऊ शकतो डिलीट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

प्रत्येकाच्या दिवसाची सुरूवात व्हॉट्सॲपवरील ‘गुड मॉर्निंग’ संदेशांनी होते. शुभसकाळ, सुप्रभात, फोटो आणि देवांचे फोटो, जीआयएफ फाईल्स अशा प्रकारच्या मेसेजेस् तुमचा मोबाईल भरत असतो. पण, या संदेशांनी फक्त तुमच्या मोबाईलची मेमरीच नाही तर भारतातील संपूर्ण इंटरनेटही व्यापून टाकले आहे.  हे  खुद्द इंटरनेटचा बाप असणाऱ्या गुगलने म्हटलयं.

भारतातून गुगलवर ‘गुड मॉर्निंग’ संदेश शोधणाऱ्यांच्या संख्येत 10 पटींनी वाढ झाली आहे. याच संदेशांनी इंटरनेट पूर्णपणे व्यापल्याचा दावा गुगलने केला आहे. एका वृत्तानुसार, भारताला व्हॉट्सॲपचे एक मोठे मार्केट समजले जाते. भारतात व्हॉट्सॲपचे तब्बल 200 कोटी सक्रिय युजर्स आहेत. सिलिकॉन व्हॅलीच्या संशोधकांच्या मते, भारतात सर्च होणारे गुड मॉर्निंग संदेश आणि फोटो इतर देशांच्या तुलनेत नेहमी टॉपला असतात.

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा हे संदेश सर्च करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. हे गुड मॉर्निंग संदेश डिलीट करण्यासाठी दिल्लीमध्ये एका ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. या अपद्वारे तुम्ही तुमच्या फोनवरील गुडमॉर्निंगचे अतिरिक्त संदेश डिलीट करु शकता.  नववर्षाच्या स्वागताच्या शुभेच्छा देणारे संदेश भारतात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या दरम्यान भारतात 20 कोटी मॅसेज पाठवण्यात आले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version