गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या बाजारात आपल्याला मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सोन्याच्या किमतीत वारंवार वाढ झाल्याना दागिने खरेदी करणाऱ्या असंख्य ग्राहकांच्या बजेटवर त्याचा परिणाम होत आहे. अशातच आज 18 सप्टेंबर 2026 रोजी सराफा बाजारात सोन्याच्या दरात आपल्याला किंचित घसपण झालेली पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरातही बदल झाल्याचे दिसत आहे, त्यामुळेच आज सोने आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी बाजारातील नवीन दर जाणून घेणे हे महत्त्वाचे ठरत आहे.
मुंबई ते नाशिक, आज कुठे किती सोन्याचा भाव?
मिळालेल्या माहितीनुसार, आज देशात पाहिलं तर 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1,53,740 रुपये आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना 1,40,928 इतके रुपये मोजावे लागत आहेत. चांदीचा दर पाहिला तर 1 किलो चांदीची किंमत ही 2,39, 200 रुपये आहे, तर 10 ग्रॅम चांदीचा भाव हा 2,392 रुपये इतका आहे.
महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक शहरानुसार सोन्याच्या दरातही काही प्रमाणात वारंवार फरक दिसून येतो. मुंबईत पाहिल तर आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 1,40,672 रुपये असून, 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1,53,460 रुपये आहे. पुणे शहरातही 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा भाव 1,40,672 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1,53,460 रुपये आहे. दुसरीकडे नागपूर आणि नाशिकमध्येही आजचे दर हे यासारखेच आहेत. या दोन्ही शहरात पाहिलं तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत ही 1,40,672 रुपये आहे तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा 1,53,460 रुपये आहे.
सोनं खरेदीपूर्वी अंतिम दराची खात्री करा
दरम्यान, सोन्याचे दागिने प्रत्यक्ष खरेदी करताना फक्त बाजारभाव पाहणे महत्त्वाचे नसते. तर जीएसटी, टीसीएस, उत्पादन शुक्ल अशा अनेक गोष्टींमुळे त्याची किंमत वाढू शकते. त्यामुळे दागिने खरेदी करण्याआधी ग्राहकांनी स्थानिक ज्वेलर्सकडूनच त्या दिवसाचा अंतिम दर तपासणे महत्त्वाचे आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.