बोंडला अभयारण्यातून, पाच बिबट्यापैकी चार बिबट्यांच पलायन

बोंडला अभयारण्यातून, पाच बिबट्यापैकी चार बिबट्यांच पलायन

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

पहाटेच्या वेळी गोव्यातील बोंडला अभयारण्यातून चार बिबट्यांनी पलायन केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पलायन केलेल्या चार बिबट्या पैकी तीन बिबट्यांना जेरबंद करण्यात वन खात्याला यश आलं आहे. मात्र एक बिबट्या अद्यापही मोकाट आहे असं वृत्त समोर आलं आहे..

बोंडला अभयारण्यात एकूण पाच बिबटे असून त्यांना पिंजऱ्यात ठेवण्यात आलं आहे. या पिंजऱ्याला जोडूनच बिबट्यांना मुक्त विहारासाठी लोखंडी तारेचं कुंपण घालून जागा आरक्षित करण्यात आली आहे. या पिंजऱ्याचं कुलूप कोणीतरी तोडलं, त्यानंतर शनिवारी पहाटेच्या सुमारास पाचपैकी चार बिबट्यांनी पलायन केलं.

पळालेल्या बिबट्यांमध्ये एक नर, एक मादी आणि दोन बछडय़ांचा समावेश होता. हा प्रकार पहाटेच्या वेळी गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या लक्षात आला. त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. सर्व प्रकाराची फोंडा पोलिसात तक्रार देऊन त्याबाबतचा पंचनामा करण्यात आला.

बिबट्यांचा तपास सुरू झाल्यावर चारां पैकी तिघे बिबटे अभयारण्याच्या परिसरातच आढळून आले. त्यांना जेरबंद करण्यात आले आणि पुन्हा पिंजऱ्यात कैद करण्यात आले. एक बिबट्या अजूनही पसार असल्याच समोर आले आहे. पण तो कुठे असेल हे वनखात्याला माहीत असल्याच वन खात्याकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकरणी बोंडला अभयारण्याच्या वन अधिकाऱ्यांनी फोंडा पोलिसात तक्रार दाखल केली.

एक बिबट्या अजूनही पसार असल्यामुळे शनिवारी अभयारण्यात येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश बंद करावा लागला. सायंकाळी उशिरापर्यंत हा चौथा बिबटा सापडला नसल्याची माहिती वन खात्याच्या सूत्रांकडून मिळाली. बोंडला अभयारण्यात घडलेली अशा प्रकारची ही पहिलीच घटना असून या प्रकरणी चौकशी होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version