Kishori Pednekar Ghatkopar : घाटकोपरच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या जेवणात काचेचे तुकडे! किशोरी पेडणेकरांचा थेट तुकाराम मुंढेंना फोन

घाटकोपरमधील पंतनगर शाळेच्या मध्यान्ह भोजनात काचेचे तुकडे आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Kishori Pednekar Ghatkopar : घाटकोपरच्या शाळेत विद्यार्थ्यांच्या जेवणात काचेचे तुकडे! किशोरी पेडणेकरांचा थेट तुकाराम मुंढेंना फोन

घाटकोपरमधील पंतनगर शाळेच्या मध्यान्ह भोजनात काचेचे तुकडे आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घाटकोपर पूर्व येथील पालिकेच्या पंतनगर शाळा क्रमांक 3 मध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मध्यान्ह भोजनात काचेचे तुकडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी शाळेला भेट देत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.

त्यांनी विद्यार्थ्यांना दिली जाणारी खिचडी स्वतः खाऊन तिचा दर्जा तपासला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांना थेट फोन करून तक्रार नोंदवत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेमुळे शालेय मध्यान्ह भोजनाच्या गुणवत्तेवर पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा- High Court on FDA Action: दोन लहान कीडे सापडल्याने हॉटेल बंद? मुंबई हायकोर्टाने एफडीएला सुनावले

विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवर आणि त्यांच्या सुरक्षिततेवर यामुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. राज्यात अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्नसुरक्षेच्या नियमभंगाविरोधात राज्यव्यापी मोहीम अधिक तीव्र केली आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, कॅफे आणि विविध खाद्य आस्थापनांवर सातत्याने धाडी टाकून अन्नाच्या गुणवत्तेची तपासणी केली जात आहे.

या कारवाईत अनेक मोठ्या आणि नामांकित आस्थापनांवरही कारवाई झाली आहे. अशातच आता या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळताच माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त करत तातडीने दखल घेतली. त्यांनी या प्रकरणी तुकाराम मुंडे यांना थेट फोन करून घटनेची माहिती दिली असून, संबंधितांवर अन्न व औषध प्रशासनाकडून काय कारवाई होते हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version