भारताच्या महालेखापालांनी त्यांच्या ताज्या अहवालात द्वारका एक्सप्रेस वे अर्थात दिल्ली आणि द्वारका या शहरांना जोडणारा महामार्ग अतिरिक्त खर्च करून बांधला गेल्याचा निष्कर्ष काढला आहे. यानंतर विरोधकांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीकेची झोड उठवली असताना त्याला गडकरींच्या कार्यालयातून एका व्हिडिओद्वारे उत्तर देण्यात आले आहे.
भारतमाला परियोजनेतील दिल्ली ते हरियाणा दरम्यानच्या द्वारका महामार्गाची गुणवत्ता शंभर वर्ष टिकेल असा दावा या व्हिडिओतून गडकरी यांनी केला आहे. अतिरिक्त खर्च झाला का? याबाबत कुठल्याही आरोपाला उत्तर देण्याऐवजी द्वारका महामार्ग हा अभियांत्रिकी कौशल्याचा चमत्कार असल्याचं गडकरी यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं आहे. हा महामार्ग कार्यान्वित झाल्यावर दिल्ली आणि आसपासच्या परिसरातली वाहतूक वेगवान होऊन प्रदूषण कमी होईल असा दावाही या निमित्ताने करण्यात आला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.