अकरावीचे प्रवेश आज बंद, ‘सर्व्हर’मधील तांत्रिक बिघाड तिसऱ्या दिवशीही

अकरावीचे प्रवेश आज बंद, ‘सर्व्हर’मधील तांत्रिक बिघाड तिसऱ्या दिवशीही

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रकियेत विद्यार्थ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय..’सर्व्हर’मधील तांत्रिक बिघाडामुळे तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांन अर्ज भरताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे शाळा, पालक आणि विद्यार्थी त्रस्त झाले असून प्रवेश अर्ज भरण्याची मुदत वाढवून देण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

 

तांत्रिक त्रुटींच्या दुरुस्तीकरिता आज मुंबईमधील प्रवेशप्रक्रिया खंडित करण्यात येणार असून २२ जून रोजी ती पूर्ववत करण्यात येणार आहे. अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे ‘एमकेसीएल’कडून हे काम काढून घेण्यात आले होते. मात्र, नव्याने नेमण्यात आलेल्या ‘नायसा’ या नोएडास्थित कंपनीलाही ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यामध्ये अपयश आले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version