2025 या सरत्यावर्षाला संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. 2025 हे वर्ष सुरुवातीपासूनच सर्वांसाठी धोक्याचं वर्ष म्हणून गेलं आहे. कारण, वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक घटना घडताना पाहायला मिळाल्या आहेत. अशातच आता नववर्ष म्हणजेच 2026 हे वर्ष काय घेऊन येणार याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे. 2026 हे वर्ष देखील संकटांची लाट घेऊन येणार की, उद्धार करणार असा प्रश्न देखील लोकांना पडला आहे. अशातच जगप्रसिद्ध फ्रेंच भविष्यवक्ता नास्त्रेदमस यांनी रहस्यमय भविष्यवाणी केली आहे.
बाबा वेंगा प्रमाणेच नास्त्रेदमस हे देखील प्रसिद्ध भविष्यवक्ता आहेत. त्यांचा जन्म 1503 साली झाला असून त्यांच नाव मिशेल द नास्त्रेदमस असं आहे. त्यांनी Les Prophéties नावाचं एक प्रसिद्ध पुस्तक लिहिलं होतं. ज्यात चार ओळींच्या गूढ कविता किंवा दोहे लिहिले असून, त्यांना क्वाट्रेन असं म्हटलं जातं. दरम्यान त्यांनी लिहलेल्या या ओळी रहस्यमय भविष्यवाणी म्हणून चर्चेत आल्या आहेत. नास्त्रेदमस यांच्या या पुस्तकात त्यांनी स्वतःच्या जन्मानंतर शेकडो वर्षांनी घडणाऱ्या घटनांची भविष्यवाणी केली आहे. तसेच त्यांनी लिहलेल्या कवितेत ‘26’ या आकड्याशी संबंधित काही संकेत दिले आहेत. ज्याचा संबंध 2026 या नवीन वर्षाशी जोडला जात आहे.
नास्त्रेदमस यांनी दोह्यात उल्लेख केलेल्या ‘मधमाश्यांच्या झुंडा’चा अर्थ जरी ‘bees’ म्हणजे मधमाश्या असा असला तरी असे काही मोजके अभ्यासक आहेत जे याचा अर्थ कीटक असा नसल्याचं म्हणतात. काही तज्ज्ञांच्या मते, हा उल्लेख आधुनिक युद्धात वापरल्या जाणाऱ्या ड्रोनच्या झुंडींकडे इशारा करत असू शकतो. आजच्या काळात ड्रोन युद्धतंत्रात मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहेत आणि भविष्यात हे अधिक धोकादायक ठरू शकतात. दुसरीकडे, इतिहासाकडे पाहिल्यास नेपोलियनच्या काळात मधमाश्या साम्राज्य, सत्ता आणि शक्तीचं प्रतीक मानल्या जात होत्या. त्यामुळे 2026 मध्ये एखादा शक्तिशाली नेता जागतिक राजकारणाचं चित्र बदलणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.