लोकसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीची पहिली बैठक

लोकसभा निवडणुकीसंदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीची पहिली बैठक

लोकसभा निवडणुकीसंदर्भात आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांत पहिली बैठक झाली असून इतर समविचारी पक्षाला ही या निवडणुकीसाठी सोबत घेण्याबाबत या बैठीकत चर्चा झाली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी होती.

या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार छगन भुजबळ, सुनिल तटकरे, दिलीप वळसे पाटील, शरद रणपिसे यांच्यासह नेते उपस्थित होते. तसेच राज्य सध्या दुष्काळाच्या छायेत आहे त्यामुळे सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा या मुद्यावर देखील दोन्ही पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी चर्चा केली.

निवडणुकी संदर्भात ही पहिलीच बैठक असल्याने कोणत्याही फॉर्म्युला यावर चर्चा न होता फक्त आघाडी संदर्भात चर्चा झाली अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. तर मनसे ला आघाडीत घ्यावे असा कोणताही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस ने दिलेला नाही असं म्हणत आघाडीत मनसेला जागा नाही असं स्पष्ट केलं. तर निवडून येणार्याला प्राधान्य दिलं जाईल असं मत जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केलं.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version