हिट होऊन देखील ‘पद्मावत’ला करोडोंच नुकसान

हिट होऊन देखील ‘पद्मावत’ला करोडोंच नुकसान

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई 

25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला आलेला पद्मावत बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतांना दिसला. करणी सेनेच्या जोरदोर विरोधालाही न जुमानता प्रेक्षकांनी पद्मावतला चंगलाच प्रतिसाद दिलेला पहायला मिळाला. इतकच नाही तर सिनेमा पाहिल्यानंतर करणी सेनेने देखील आपला विरोध मागे घेण्याचा निर्णय घेतला आणि सिनेमाच समर्थन देखील केले.

श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना-महाराष्ट्र चे राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्र सिंह कटार यांनी एक चिट्ठी लिहून सांगितले की, त्यांनी 2 फेब्रुवीरी ला पद्मावत सिनेमा पाहिला, त्यात राजपूतांच्या वीरतेच आणि त्यागाच अगदी सुरेख सुंदर चित्र या सिनेमा द्वारे संजयलीला भंसाळी यांनी दाखवण्याचा खुप चांगला प्रयत्न केला आहे. सिनेमात राणी पद्मावतींची भूमिकादेखील महानतेला समर्पित आहे. सिनेमाविषयी आणखी बोलताना त्यांनी सांगितल की, या सिनेमात राणी पद्मावती आणि अलाउद्दीन यांमध्ये कोणताही सीन नाही.  

तर, राजपूत समाजाच्या भावनांना तडा जाईल असा कोणताही प्रकार या सिनेमात दिसला नाही. आम्ही आमचा विरोध बीना शर्त मागे घेतो आणि असं आश्वासन देतो की राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेशमधील सर्व  सिनेमा गृहात हा चित्रपट नक्की प्रदर्शित होईल. पद्मावत प्रदर्शित झाल्यानंतर या सिनेमाने तब्ब्ल 150 करोडचा आंकडा पार केला. मात्र, एवढा मोठा टप्पा पार करून देखील सिनेमाला करोडोंचा तोटा देखील झाला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version