कोपरखैरणे पोलीस ठाण्यात समीर वानखेडेबाबत तक्रार दाखल

कोपरखैरणे पोलीस ठाण्यात समीर वानखेडेबाबत तक्रार दाखल

  समीर वानखेडे यांच्यावर पुन्हा एक तक्रार करण्यात आली आहे.  एनसीबीच्या कारवाईत पंच राहिलेले शेखर कांबळे यांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात समीर वानखेडेबाबत तक्रार दाखल केली आहे. ८ ते १० कागदावर समीर वानखेडे यांनी सह्या घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.

  समीर वानखेडे यांनी शेखर कांबळे यांच्याकडून ८ ते १० कागदांवर सह्या घेतल्या आहेत. त्यामुळे एनसीबीचे पंच राहिलेले शेखर कांबळे यांच्या जीवाला धोका असल्याची तक्रार त्यांनी दाखल केली. खारघर येथे नायजेरियन नागरिकावर केलेल्या ड्रग्ज कारवाईत शेखर कांबळे पंच होते. या कारवाई दरम्यान समीर वानखेडे यांनी ८ ते १० कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्याचा आरोप शेखर कांबळे यांनी केला आहे. तसेच २७ ऑक्टोबर रोजी एनसीबी कार्यालयातील अनिल माने यांनी कांबळे यांना कार्यालयात बोलवले होते त्यामुळे ते घाबरेल असल्याचेही शेखर कांबळे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version