वृत्तसंस्था, दिल्ली
फिफा विश्वचषकातील ‘ग’ गटातील सामन्यात बेल्जियमने इंग्लंडचा 1-0 ने पराभव केला आहे. बेल्जियमने फुटबॉल विश्वचषकातील ‘ जी ‘ गटामध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. त्यामुळे आता बेल्जियम जपानला धडकणार आहे. तर इंग्लंडला या पराभवामुळे दुसरे स्थान मिळाले असून त्यांना बाद फेरीत कोलंबियाला सामोरे जावे लागणार आहे.
या पराभवामुळे इंग्लंडला ‘ग’ गटात दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. बेल्जियम आणि इंग्लंड याच दोन संघांनी ग गटातून बाद फेरीत धडक मारली आहे.
#FifaWorldCup2018 पोलंडचा विजय,पराभवानंतरही जपानला बाद फेरीचं दुसरं तिकीट
#FifaWorldCup2018 आईसलँडवर विजय, क्रोएशियाचं ‘ ड ‘ गटात प्रथम स्थान
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.