Buldhana Father-Daughter Viral Video : बापाची अनोखी “बेटी पढाओ” मोहीम; शाळेच्या पहिल्या दिवशी लेकीची थेट उंटावर बसवून शाळेत पाठवणी

याचपार्श्वभूमिवर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील सराफा मोहल्ल्यातील रहिवासी रवी जोशी यांनी त्यांची मुलगी क्षिप्रा हिचा सहाव्या वर्गातील प्रवेशाचा पहिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला.
Buldhana Father-Daughter Viral Video : बापाची अनोखी “बेटी पढाओ” मोहीम; शाळेच्या पहिल्या दिवशी लेकीची थेट उंटावर बसवून शाळेत पाठवणी

विदर्भातील सर्वच शाळांची घंटा मंगळवारी 30 जूनला वाजली. उन्हाळी सुटीनंतर नव्या सत्रातील पहिल्या दिवसाच्या निमित्ताने शैक्षणिक संस्थांनी शाळा प्रवेशोत्सव सोहळे आयोजित करून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. याचपार्श्वभूमिवर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील सराफा मोहल्ल्यातील रहिवासी रवी जोशी यांनी त्यांची मुलगी क्षिप्रा हिचा सहाव्या वर्गातील प्रवेशाचा पहिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. बुलढाणा जिल्ह्यात उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजायला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा- PMC Schools Timings : पालकांनो लक्ष द्या! शाळेच्या वेळेत मोठा बदल; महापालिका क्षेत्रातील शाळांसाठी आता नवा नियम लागू

कमी अधिक फरकाने अनेक शाळांमध्ये चिमुकल्यांचा पुन्हा एकदा किलबिलाट पाहायला मिळतो आहे. अशातच शाळेच्या पहिल्या दिवशी आपल्या लेकीला थेट उंटावर बसून शाळेपर्यंत एका बापाने पोहोचवल आहे. लेकीच्या या उंटवारीची परिसरात मोठी चर्चा होऊ लागली आहे. बचाव बेटी पढाओ चा अनोखा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. खामगाव शहरातील सराफा भागातील रवी जोशी यांनी हा आगळावेगळा संदेश देऊन एका बापाचं कर्तव्य काय असतं हे देखील यातून दाखवून दिल आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version