Buldhana News : बुलढाणा हळहळलं! दोनदा तीच गोष्ट घडली,अखेर बाप-लेकांने…; घरच्यांनी पाहताच मोठा धक्का

त वडील आणि लेकावर बँकेचं कर्ज होतं. शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने हे कर्ज फेडण्याचा प्रश्न दिवसेंदिवस दोघांसमोर गंभीर होत गेला.
Buldhana News : बुलढाणा हळहळलं! दोनदा तीच गोष्ट घडली,अखेर बाप-लेकांने…; घरच्यांनी पाहताच मोठा धक्का

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील पारखेड गावात मन सुन्न करणार घटना समोर आलेली आहे. कर्जबाजारीपणा, सततची नापिकी आणि शेतीसमोरील संकटाला कंटाळून बाप-लेकाने एकाच दोरीचा आधार घेत स्वत:चे जीवन संपवल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेने पारखेड गावावर शोककळा पसरली असून संबंधित कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत वडील आणि लेकावर बँकेचं कर्ज होतं. शेतीमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने हे कर्ज फेडण्याचा प्रश्न दिवसेंदिवस दोघांसमोर गंभीर होत गेला. त्यातच यंदाच्या पावसाचा मोठा फटका शेतीला बसला. सततच्या नापिकीमुळे या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती.

हेही वाचा-Ganpati Visarjan : बाप्पाला निरोप देताना घडले अघटित; संगमेश्वरमध्ये बाप-लेक पाण्यात बुडाले; मुलाचा दुर्दैवी मृत्यू

दोनदा पेरणी करुनही पदरी निराशाच
या कुटुंबाने यंदा शेतीत दोन वेळा पेरणी केली होती. मात्र, पावसाने योग्य साथ न दिल्याने आणि प्रतिकूल हवामानामुळे शेतीमधील उभं पीक करपून गेलं. त्यामुळे केलेला सर्व खर्चही वाया गेला. उत्पन्नाची आशा गेल्याने कुटुंबासमोर आर्थिक संकट अधिकच निर्माण झालं. आता या कुटुंबावर तिसऱ्यांदा पेरणी करण्याची वेळ आली आहे. मात्र, घरातील कर्त्या व्यक्तींच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा महत्त्वाचा आधारच हरपला आहे. त्यामुळे पुढील शेताचा खर्च, आधीच असलेल्या कर्जाची परतफेड आणि घरचा दररोजचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा मोठा प्रश्न या कुटुंबासमोर उभा राहिला आहे.

दुख:त गोष्ट म्हणजे एका बाजूला बाप-लेकाच्या मृत्यूचं दुःख, तर दुसऱ्या बाजूला डोक्यावरचं कर्ज आणि शेतीची बिकट अवस्था, अशा दुहेरी संकटात हे कुटुंब सापडलं आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणी आणि शेतीच्या अनिश्चिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version