जीवघेण्या फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूनंतर कृषी विभागाने केली धडक कारवाई

जीवघेण्या फवारणीमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूनंतर कृषी विभागाने केली धडक कारवाई

जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली

पिकावर बोडअळी, गुलाबी बोडअळी, मलीबगचा प्रचंड हल्ला रोखण्यासाठी प्रोफेक्स सुपर वा पोलो यांसारख्या अतिविषारी कीटकनाशकाची फवारणी केली जाते. पण, हीच फवारणी शेतकऱ्यांच्या जीवावर बेतली आहे. यामध्ये 18 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

चौघांनी आपली दृष्टी गमावली आहे. तर 600 हून अधिक शेतकऱ्यांना या किटकनाशकाची बाधा झाली.  या सर्व घटनेनंतर सरकारकडून प्रत्येकी ३ लाख रुपये नुकसान भरपाई देणार असल्याचं जाहीर करण्यात आले.

या सर्व प्रकारावर कारवाई करत हिंगोलीच्या कृषी विभागाने धडक कारवाई करत 27 लाखांची कीटकनाशके जप्त केली. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version