जय महाराष्ट्र न्यूज, लातूर
लातूर जिल्ह्यातला निलंगा तालुक्यात मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. आणि हे हेलिकॉप्टर एका घरावर कोसळलं. त्या घरातील चार लोकं जखमी झाली. मात्र मुख्यमंत्री बचावल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला.
ज्या घरावर हे हेलिकॉप्टर कोसळलं त्या घरात साधी काडीपेटीसुद्धा पेटवू नका असा सज्जड दमचं पोलिसांनी घरातल्या लोकांना दिला. तसेच घराबाहेर पोलिसांचा पाहारा असल्यामुळे दोन दिवसापासून या घरातली चूल देखील पेटली नाही.
त्यामुळे दोन दिवसापासून हे कुटुंब उपाशी आहे. त्यामुळे आमची चूक नसताना आम्ही का उपाशी राहायचे? तसेच याकडे कोणी लक्ष देईल का? अशी हाक हे कुटूंब देत आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.